Actions

युगान्त

From

युगान्त
Author इरावती कर्वे
Original title (if not in English) युगान्त
Country भारत
Language मराठी
Subject(s) महाभारत
Publisher देशमुख आणि कंपनी
Released 1976
Pages 288

blog comments powered by Disqus


युगान्त

1968 चा साहित्य आकादमी पुरस्कार.

महाभारत हे सुविख्यात महाकाव्य आहे. वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून, महाभारतातील काही प्रमुख पात्रांच्यी जीवनावर प्रकाश टाकणार्‍या लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. मूळ कथेबरोबरच, तात्कालिक समाजरचना, चाली-रिती, विचारसरणी यावरही वेळोवेळी भाष्य केलेले या लेखांत आढळते.

पुरस्कार, मानसन्मान

1968 चा साहित्य आकादमी पुरस्कार.

पात्र परिचय

  • भीष्म - भीष्म पितामह.

प्रकरणे

प्रकरण पहिले : शेवटचा प्रयत्न

या प्रकरणात, युद्ध थांबवण्यासाठी निर्वाणीचा प्रयत्न करणार्‍या, स्वत:च्या प्रतिज्ञेत व त्यामुळे तयार झालेल्या भूमिकेत गुरफटत गेलेल्या भीष्माची ओळख लेखिकेने करून दिली आहे.

प्रकरण दुसरे : गांधारी

पती अंधळा आहे हे कळताच स्वत:च्या डोळ्यावर पट्टी बांधून घेणार्‍या गांधारीची कथा या लेखात लेखिकेने रचली आहे.

प्रकरण तिसरे : कुंती

इतर पुरुषांच्या (पिता, पती, पुत्र) निर्णयांमुळे आयुष्यभर फरफट झालेल्या पण या प्रसंगांना धीराने तोंड देणार्‍या व्यथा.

प्रकरण चौथे : पितापुत्र

विदुराचा पांडवांकडील ओढा, युधिष्ठीर व विदुर यांच्यातील साम्यस्थळे व परस्पर संबंधांचा यावरून हे दोघे पिता पुत्र असावेत का

या विषयीचा तात्कालिक समाजिक रुढींच्या प्रकाशात केलेला उहापोह.

प्रकरण पाचवे : द्रौपदी

सीता व 'नाथवथी अनाथवत' द्रौपदी या दोन महाकथांतील मुख्य स्त्री पात्रांची तुलना.

प्रकरण सहावे : मयसभा

मयसभेच्या निर्मितीच्या मागची कथा, खांडववना दहना समयीचे कर्‍उष्णार्जुनाचे वर्तन, तक्षकाचा सूड, इंद्रप्रस्थाचे पुढे काय झाले वगैरे.

प्रकरण सातवे : परधर्मो भयावह:

महाभारत कालीन जातीव्यवस्था, कर्तव्ये, महाभारतातील दोन प्रमुख ब्राम्हण पात्रे द्रोण व अश्वत्थामा यांचे महाभारतील स्थान याविषयी.

प्रकरण आठवे : मी कोण?

स्वत:च्या उतावळेपणाने नितनवीन संकटात सापडणारा कर्ण, वेळोवेळी उतावळ्या कर्णाला पडलेला न उकललेला प्रश्न 'मी कोण' हा प्रश्न.

प्रकरण नववे : कर्‍उष्ण वासुदेव

कर्‍उष्णाचे देवत्व, त्याची 'वासुदेव' होण्याची घडपड याविषयी.

प्रकरण दहावे :युगान्त

महाभारतकालीन समाज, चालीरिती व त्यापुढील येणार्‍या कथांतून या सार्‍यात होत जाणारे बदल, यावरून महाभारत एका युगाचा अंत असल्याचा तर्क.